‘आई कुठे काय करते’फेम गौरी कुलकर्णीची फसवणूक; पोस्ट शेअर करत दिली माहिती
अभिनेत्री गौरी कुलकर्णी 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात झाली. यामध्ये तिने गौरीची भूमिका साकारली होती. नंतर ती 'प्रेमास रंग यावे' या मालिकेत झळकली. गौरी सोशल मीडियावर सक्रिय असून, तिने नुकतीच एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात तिने 'एलिगेंझप्रोफेशनल' या ब्रँडने तिचे पैसे थकवल्याचे आणि धमकी दिल्याचे सांगितले. गौरीचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.