“लग्न हे शेवटी राजकारणच”, ‘आई कुठ काय करते’ फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं मत; म्हणाली…
'आई कुठे काय करते' या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने लग्नाबद्दल तिचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. तिने सांगितले की, पितृसत्ताक समाजात पुरुषांनाही संघर्ष करावा लागतो, पण स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वासाठी अधिक झगडावे लागते. तिने लग्नाला सत्तेचा खेळ म्हटले आहे. तसंच पुरुषांनी स्त्रियांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. तिच्या मते, दोघांनी मिळून एकत्र निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.