“शेती एक संस्कार”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री रमली शेतकामात; चाहत्यांकडून कौतुक
मराठी मनोरंजन विश्वातील साधेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आश्विनी महांगडे हिचा शेतीकाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रसिद्ध झालेली आश्विनी सोशल मीडियावर सक्रिय असून, ती शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेतीचे महत्त्व सांगते. चाहत्यांनी तिच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.