‘जुळून येती रेशीमगाठी’चा दुसरा भाग यावा का? ललित प्रभाकरने दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाला…
अभिनेता ललित प्रभाकरने 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते, त्या वेळची जादू आणि ऊर्जा आता पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. मालिकेतील प्रत्येक पात्राचा खरेपणा आणि एकत्र कुटुंबाची गोष्ट प्रेक्षकांना भावली होती. ललितने सांगितले की, या मालिकेमुळे त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि आजही आदित्य-मेघना जोडीचे फॅन पेजेस सक्रिय आहेत.