“सायकलवरून आलेल्या एका माणसाने मला…”, अभिनेत्रीने सांगितला भयंकर अनुभव
अभिनेत्री आशा नेगीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांतील कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला. तिला एक कोऑर्डिनेटर तडजोड करण्यास सांगत होता, पण तिने स्पष्ट नकार दिला. शाळा आणि कॉलेजमध्येही तिला विनयभंगाचे प्रसंग सहन करावे लागले. तिने या प्रसंगांना धैर्याने तोंड दिले. टीव्ही मालिकांनंतर तिने 'लुडो' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि 'हनीमून फोटोग्राफर' सीरिजमध्ये काम केले.