गिरीजा ओकसह ‘फॅमिली मॅन’च्या जेकेनं गायलं ‘हे’ लोकप्रिय मराठी गाणं; नेटकरी म्हणाले…
गिरीजा ओक आणि शरीब हाश्मी यांनी 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना' हे जुने मराठी गाणं गायले आहे. गिरीजा ओक मराठी, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर काम करणारी अभिनेत्री असून ती उत्तम गायिका देखील आहे. शरीब हाश्मी 'फॅमिली मॅन' सीरिजमधून प्रसिद्ध आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यावर चांगला प्रतिसाद दिला आहे.