मधुरा वेलणकरला मनोरंजन नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं काम
मराठमोळी अभिनेत्री मधुरा वेलणकर हिने मनोरंजन क्षेत्रात अपघाताने प्रवेश केला. तिला लहानपणापासून क्रीडा क्षेत्रात रस होता आणि एअर होस्टेस व्हायचं होतं. मात्र, दोरी मल्लखांब करताना अपघात झाल्यामुळे तिने नाटकात काम केलं आणि तिथूनच अभिनयाची गोडी लागली. तिने विविध माध्यमांतून काम करताना अनुभवातून शिकत आपली कारकीर्द घडवली.