Bigg Boss मराठी मध्ये दिसणार? प्राजक्ता माळीला चाहत्याचा थेट प्रश्न; अभिनेत्री म्हणाली…
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीला एका चाहत्यानं या शोमध्ये सहभागी होण्याविषयी विचारलं असता, तिनं "कधीही नाही" असं उत्तर दिलं. प्राजक्ता 'बिग बॉस'मध्ये स्पर्धक म्हणून नाही, पण गेस्ट म्हणून सहभागी झाली होती. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये सूत्रसंचालन करते आणि प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.