‘ठरलं तर मग’मधील अभिनेत्रीला झालाय ‘टिनिटस’, ‘ही’ लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष; वाचा..
लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा केतकर-वर्तकने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या टिनिटस (Tinnitus) आजाराबद्दल खुलासा केला. गेल्या १७ वर्षांपासून ती या कानासंबंधित आजाराचा सामना करतेय. टिनिटस म्हणजे बाहेर कोणताही आवाज नसतानाही कानात आवाज ऐकू येणे. उच्च रक्तदाब, अॅनिमिया, थायरॉईडचा असमतोल यांसारख्या कारणांमुळे हा त्रास होऊ शकतो. उपचारांमध्ये कानाची तपासणी, एमआरआय, सीटीस्कॅन, साउंड थेरपी यांचा समावेश होतो. मोठ्या आवाजापासून संरक्षण, ताण कमी करणे, पूर्ण झोप घेणे हे उपाय उपयुक्त ठरतात.