ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडे यांनी ‘या’ गाण्यावर धरला ठेका; नेटकरी म्हणाले…
ऐश्वर्या आणि तितीक्षा यांनी सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग असलेल्या ‘आराधी आलाय नवा ग नवा’ या गाण्यावर ठेका धरला आहे. महाराष्ट्राच्या लोककलेची झलक असलेल्या या गाण्यावर दोघींनीही सुंदर डान्स स्टेप्स केल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि पारंपरिक लूक यामुळे खास नवरात्रीचा माहोल तयार झाला आहे. 'नवरात्री वाइब्स' असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. त्यांच्या या रीलवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.