“मी मुस्लीम त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया
लोकप्रिय टीव्ही अभिनेता अली गोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात त्याने 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला नाही म्हणून त्याला ट्रोल करण्यात आलं. अलीने स्पष्ट केलं की, तो प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि त्याने कोणत्याही धर्माचा अनादर केला नाही. त्याने सांगितलं की, तो पहिल्यांदाच गणपती विसर्जनात सहभागी झाला होता आणि त्याला या प्रथांबद्दल पूर्ण माहिती नव्हती. त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत.