अभिनेत्री लग्नाच्या ८ वर्षांनी झाली आई, लेकीचं नाव ठेवलं ‘शिवोना’; पती आहे हिरे व्यापारी
'अमृत मंथन' फेम अभिनेत्री डिंपल झांगियानी लग्नानंतर ८ वर्षांनी आई झाली आहे. तिने आपल्या लेकीचं नाव शिवोना ठेवलं आहे, जे भगवान शंकरापासून प्रेरित आहे. डिंपलने डिसेंबर २०१६ मध्ये सनी असरानीशी लग्न केलं होतं. तिने १ फेब्रुवारी २०२५ रोजी आपल्या पहिल्या मुलीचं स्वागत केलं. मातृत्वाचा प्रवास कठीण होता, पण आता ती या नवीन टप्प्यात आनंदी आहे.