‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याने घेतला अवयवदानाचा निर्णय, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून अंकुर वाढवेने लोकप्रियता मिळवली. अंकुरने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अवयवदान आणि देहदानाचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती शेअर केली आहे. त्याने जे.जे. हॉस्पिटलबाहेरील पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. अंकुरची ही पोस्ट व्हायरल झाली असून, अनेकांनी त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. तो सध्या रंगभूमीवर 'अंजू उडाली भुर्रर्रर्र' या बालनाट्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.