‘अशोक मा.मा.’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने मानले ‘त्या’ व्यक्तीचे आभार
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेली 'अशोक मा.मा.' ही मालिका १० जानेवारी रोजी संपणार आहे. मुख्य अभिनेत्री रसिका वखारकर यांनी अशोक सराफ यांच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सराफ यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांचे आभार मानले. मालिकेचा शेवट आनंदी वळणावर होणार असून, अशोक आणि निवेदिता यांच्या लग्नाने कथा संपेल.