Bigg Boss फेम अनुराग डोभालची प्रकृती खालावली, झालेला भीषण अपघात; मॅनेजरने दिली ‘ही’ माहिती
‘बिग बॉस १७’मधील एक्स स्पर्धक अनुराग डोभालचा गाझियाबादमध्ये अपघात झाला. त्याच्या फुफ्फुसांना दुखापत होऊन न्यूमोनिया झाला आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताच्या वेळी तो इन्स्टाग्राम लाईव्ह करत होता. अनुरागच्या भावाने त्याच्यावर प्रसिद्धीसाठी नाटक केल्याचा आरोप केला आहे. अनुरागची पत्नी रितिकाने सोशल मीडियावर सूचक पोस्ट शेअर केली आहे.