Bigg Boss 18मध्ये पुन्हा शारिरीक हिंसा, अविनाश-रजत दिग्विजयच्या अंगावर धावून गेले अन्…
‘बिग बॉस’चं १८वं पर्व आता मध्यावर आलं आहे. सध्या नववा आठवडा सुरू आहे. तसंच यंदाच पर्व १०० दिवसांपेक्षा अधिक दिवस होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण, घरातील सदस्यांमध्ये सातत्याने मारामारी आणि भांडणं होत आहेत. आतापर्यंत बऱ्याचदा हिंसा झाली आहे. पण, याविरोधात ‘बिग बॉस’ने कठोर पाऊल उचललं नाही. मात्र, आता सलमान खान अविनाश मिश्रा आणि रजत दलाल यांच्याकडून झालेल्या शारिरीक हिंसेविरोधात महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…