Bigg Boss 18 : पहिल्या नॉमिनेशन टास्कमध्ये झाला राडा, गुणरत्न सदावर्ते झाले टार्गेट
'बिग बॉस १८'च्या सुरुवातीच्या दोन दिवसांतच घरातील सदस्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत. पहिल्या दिवशी राशनसाठी दिलेला टास्क सदस्य योग्यरित्या पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे राशन कमी मिळाले. जेलमध्ये असलेल्या हेमा शर्मा आणि तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी राशनवर अधिकार मिळवण्याचा पर्याय निवडला. पहिली नॉमिनेशन प्रक्रिया सुरू झाली असून, करण मेहरा आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात वाद झाला. विवियन डिसेना आणि चाहत पांडे यांच्यातही वाद झाले.