‘बिग बॉस’फेम शिल्पा शिरोडकरला करोनाचं निदान; अभिनेत्रीने पोस्ट करीत दिली माहिती
शिल्पा शिरोडकर नुकतीच 'बिग बॉस'च्या १८ व्या पर्वात झळकली होती आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. तिने नुकतीच सोशल मीडियावर कोविड झाल्याची माहिती दिली आहे. शिल्पाने चाहत्यांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. सोनाक्षी सिन्हा आणि नम्रता शिरोडकरने तिला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या आगामी 'जटाधारा' या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे.