फराह खान भडकली तजिंदर बग्गासह ईशा सिंहवर, सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली…
Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाच्या येणाऱ्या वीकेंडच्या वारमध्ये सलमान खान नसणार आहे. सलमान खानच्या ऐवजी फराह खान घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेणार आहे. आठवड्याभरात बऱ्याच गोष्टी घडल्या, कोणी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली, तर कोणी शारिरीक हिंसा केली. यावरून फराह खानने सदस्यांना चांगलंच झापलं आहे. याचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.