प्रणित मोरे पोहोचला मुंबईच्या घरी, कुटुंबियांनी ‘असं’ केलं सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल
'बिग बॉस १९'चा सीझन संपल्यानंतर विजेता गौरव खन्ना ठरला, तर फरहाना भट्ट उपविजेती ठरली. मराठमोळा प्रणित मोरे तिसऱ्या क्रमांकावर आला. शोमधून बाहेर पडल्यावर प्रणितच्या मुंबईतील घरी जंगी स्वागत करण्यात आलं. त्याच्या भावाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला. चाहत्यांनी प्रणितला विजेता मानलं असून, त्याच्या प्रवासातील मैत्री आणि मराठमोळ्या संस्कारांनी सर्वांची मनं जिंकली.