प्रणित मोरे होणार ‘बिग बॉस १९’चा विजेता? वोटिंग ट्रेंडमध्येही आहे अव्वल स्थानावर, पाहा…
'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले आज (७ डिसेंबर) पार पडणार आहे. शोमधील स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. सोशल मीडियावर विजेत्याच्या संभाव्य नावांची चर्चा आहे. सध्याच्या वोटिंग ट्रेंडनुसार प्रणित मोरे पहिल्या क्रमांकावर आहे, तर गौरव खन्ना दुसऱ्या क्रमांकावर आहे. फिनालेमध्ये विजेत्याबद्दल अधिकृत घोषणा होईल. 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले कलर्स टीव्ही आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.