मी इतका गरीब आहे की…; प्रणित मोरेनं सांगितला विमानातला मजेशीर प्रसंग; म्हणाला…
'बिग बॉस १९' संपला असला तरी स्पर्धकांची चर्चा सुरूच आहे. नुकतीच मुंबईत पार्टी झाल्यानंतर स्पर्धक दुबईतल्या पार्टीसाठी गेले. प्रवासादरम्यान प्रणित मोरेने मजेशीर किस्सा शेअर केला. तो पहिल्यांदाच विमानाच्या बिजनेस क्लासमध्ये प्रवास करत होता आणि सीट मागे कशी घ्यायची हे त्याला कळत नव्हतं. त्याने एअर हॉस्टेसला विचारून ते शिकून घेतलं. प्रणितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.