निक्कीला मारणं पडलं महागात, आर्याला बिग बॉसने दाखवला बाहेरचा रस्ता
'बिग बॉस मराठी'च्या सातव्या आठवड्यात आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात कॅप्टन्सी टास्कदरम्यान वाद झाला. वादाच्या दरम्यान आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. या घटनेनंतर बिग बॉसने आर्याला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. रितेशने आर्याला निक्कीच्या वागण्यावरून तिला समज दिली आणि बिग बॉसने आर्याला घरातून निष्कासित केलं.