सुरज चव्हाणला केर काढताना पाहून उत्कर्ष शिंदे म्हणाला, “शिक्षण नसूनही कधी…”
'बिग बॉस मराठी ५' च्या दुसऱ्या आठवड्यात सुरज चव्हाण सतत काम करताना दिसतोय. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बाकीचे स्पर्धक बसलेले असताना सुरज केर काढतोय. हा प्रोमो पाहून उत्कर्ष शिंदेने सुरजच्या कामाचे कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनीही सुरजच्या साधेपणाचे आणि माणुसकीचे कौतुक केले आहे.