आर्या जाधव कोकण हार्टेड गर्लच्या लग्नाला जाणार नाही; व्हिडीओ शेअर करत म्हणाली….
'बिग बॉस मराठी ५' फेम अंकिता वालावलकर आणि म्युझिक डायरेक्टर कुणाल भगत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाआधीचे सोहळे सुरू झाले असून, कोकणातील देवबाग येथे लग्न होणार आहे. कुणाल व अंकिताचे मित्र-मैत्रिणी आणि पाहुणे देवबागला पोहोचत आहेत. या दरम्यान, बिग बॉस फेम आर्या जाधवने त्यांच्या लग्नाबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने अंकिता कुणालच्या लग्नाला जाणार नसल्याचं म्हटलं आहे.