‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने भाऊबीजनिमित्ताने धनंजय पोवारला दिलं हटके गिफ्ट
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेल्या लोकप्रिय अंकिता वालावलकरने काही दिवसांपूर्वी भाऊबीज साजरी केली. कोल्हापुरचा ढाण्या वाघ म्हणजेच धनंजय पोवारबरोबर अंकिताने भाऊबीज साजरी केली. होणाऱ्या नवऱ्याबरोबर धनंजय पोवारच्या घरी अंकिता गेली होती. आधी अंकिता धनंजय पोवारच्या फर्निचरच्या दुकानात त्याला सरप्राइज देण्यासाठी गेली. त्यानंतर ती धनंजयच्या घरी गेली होती. यावेळी तिने धनंजयला ओवाळून एक हटके गिफ्ट दिलं. ज्याचा व्हिडीओ तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.