Bigg Boss Marathi फेम निक्की तांबोळीने दिली प्रेमाची कबुली! लग्नाबद्दल म्हणाली…
निक्की तांबोळीने प्रेमाची कबुली दिली आहे. अरबाज पटेल व निक्की तांबोळी मागील काही महिन्यांपासून फक्त मित्र असल्याचं म्हणत होते. पण आता या दोघांनीही एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं आहे. दोघांनीही एकमेकांचं कौतुक केलं आहे. निक्की खूप काळजी घेते, असं अरबाज म्हणाला. तर अरबाजबरोबर सुरक्षित वाटतं, तो बदलण्याचा प्रयत्न करत नाही, असं निक्की म्हणाली.