Suraj chavan met kajal Shinde
1 / 31

Video: भेटायला आलेल्या तिला सूरच चव्हाण म्हणाला, “तू माझी हिरोईन आहेस”

बारामतीजवळच्या मोढवे गावातील सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करून विजेतेपद मिळवणारा सूरज गावी पोहोचल्यावर त्याची मैत्रीण काजल शिंदेशी भेट झाली. नेटकरी त्यांना लग्नाचा सल्ला देत आहेत. सूरज लवकरच 'राजाराणी' चित्रपटात दिसणार आहे. त्याला १४.६ लाख रुपये आणि इतर भेटवस्तू मिळाल्या आहेत.

Swipe up for next shorts
south superstar ram charan goes barefoot heads to lucknow video viral
2 / 31

दाक्षिणात्य सुपरस्टार अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रम्हचर्यचं पालन

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण ( Ram Charan ) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘गेम चेंजर’मुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात राम चरण अभिनेत्री कियारा अडवाणीबरोबर झळकणार आहे. त्यामुळे रामच्या चाहत्यांमध्ये ‘गेम चेंजर’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त पोस्टर्स आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर लाँच सोहळा लखनऊमध्ये पार पडला. यावेळी राम चरण अनवाणी पायाने पोहोचलो होता. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

Swipe up for next shorts
7 year old boy drew a picture of Dhananjay Powar on his hand
3 / 31

७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली…

अलीकडेच धनंजय पोवारने ( Dhananjay Powar ) सूरज चव्हाणची खास भेट घेतली. तसंच वैभव चव्हाण आणि इरिनाला देखील तो भेटला. या भेटीदरम्यान जान्हवी किल्लेकर सुद्धा होती. दिवाळीनिमित्ताने ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेल्या या सदस्यांनी खास सूरजचा गावी जाऊन भेट घेतली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. अशातच धनंजयने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये एका आईने आपल्या लेकाविषयी धनंजयला सांगितलं आहे. ७ वर्षांचा लेक धनंजयचा इतका मोठा चाहता आहे की, त्याने हातावर डीपीचं चित्र काढलं आहे.

Swipe up for next shorts
New Maruti Suzuki Dzire earns 5-star rating in Global NCAP safety test Delivers 25.71 Kmpl 2024 Maruti Dzire features and engine
4 / 31

मारुतीने केली बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग

ऑटो 4 hr ago

2024 Maruti Suzuki Dzire: मारुती सुझुकी ११ नोव्हेंबर रोजी भारतात आपली नवीन जनरेशन २०२४ मारुती सुझुकी डिझायर लॉंच करणार आहे. आता लॉंच होण्याआधीच या कारबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. नवीन मारुती सुझुकी डिझायरने ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रौढांच्या सुरक्षेसाठी (Adult Safety) परिपूर्ण 5-स्टार रेटिंग आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी (Child Safety) 4-स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. मारुती सुझुकीच्या नवीन डिझायरने 5-स्टार ग्लोबल NCAP रेटिंगसह इतिहास रचला आहे, जो ऑटोमेकरसाठी पहिला आहे.

Aishwarya avinash narkar in front of old father reaction viral
5 / 31

वडिलांबरोबर प्रँक केला, पण घडलं उलटंच; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि पती अविनाश नारकर यांनी इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघे ऐश्वर्याच्या वडिलांसमोर डान्स करताना दिसतात. त्यांनी प्रँक करण्याचा प्रयत्न केला, पण ऐश्वर्याचे वडील डान्स एंजॉय करू लागले. व्हिडीओला "बाबा इज लव्ह" असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
6 / 31

स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली…

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेत अनेक छोटी पात्र झळकली; ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यापैकी एक म्हणजे अरुंधतीची मैत्रीण देविका. अभिनेत्री राधिका देशपांडेने देविका हे पात्र उत्तमरित्या साकारलं होतं. नुकतंच राधिकाने एका मुलाखतीमध्ये स्त्रीने टिकली लावण्याविषयी आपलं परखड मत मांडलं. ती नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…

Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
7 / 31

“आम्ही अजूनही…”, हार्दिक पंड्यापासून घटस्फोट घेतल्यावर पहिल्यांदाच नताशा झाली व्यक्त

अभिनेत्री व मॉडेल नताशा स्टॅनकोविक आणि क्रिकेटपटू हार्दिक पंड्या विभक्त झाले आहेत. जुलै महिन्यात त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली. नताशा सर्बियात असताना तिने ही घोषणा केली होती, पण ती भारतात परतली आहे. नताशा आणि हार्दिक अगस्त्याचे सह-पालक आहेत. नताशा सर्बियाला कायमची जाणार नाही, कारण तिचा मुलगा मुंबईत शाळेत जातो. ती सध्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.

Sachin Pilgaonkar ashok saraf starr navra maza navsacha 2 release on amazon prime
8 / 31

५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार

 ५० दिवसांनंतर आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. यासंदर्भात सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच पोस्ट केली आहे. “आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहात देखील सुरू आहे”, असं सचिन पिळगांवकरांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितलं आहे.

raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
9 / 31

“प्रिय आजोबा…”, प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…

एकेकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणारे, प्रसिद्ध खलनायक म्हणजे राजशेखर. राजशेखर यांच्या नातवाने एक सुंदर पत्र लिहिलं आहे; जे सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. राजशेखर यांच्या नातवाचं नाव राज आहे. राजने राजशेखर यांच्या जयंतीनिमित्ताने हे भावुक पत्र लिहिलं आहे.

Phullwanti on OTT
10 / 31

प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ OTT वर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता आणि आता तो ओटीटीवर रेंटवर उपलब्ध आहे. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली. प्रेक्षकांना 'फुलवंती' सिनेमा प्राइम व्हिडीओवर पैसे मोजून पाहता येईल. पेशवाई काळातील सुप्रसिद्ध नर्तिका फुलवंती आणि व्यंकटशास्त्री यांची कथा असलेल्या या चित्रपटात प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत आहेत.

Fabulous Lives vs Bollywood Wives fame Shalini Passi said Black salt aka kala namak is the biggest detox that removes water retention
11 / 31

Fabulous Lives vs Bollywood Wives फेम शालिनी पासीने सांगितली डाएटमधली ‘ही’ सीक्रेट गोष्ट

Shalini Passi Diet Secret: नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्यूलस लाईव्स वर्सेस बॉलीवूड वाईव्स’ (Fabulous Lives of Bollywood Wives) या सीरिजमुळे सध्या शालिनी पासी या चर्चेत आहेत. यामुळे त्यांचे फॅन्स त्यांच्या लाईफस्टाईल आणि डाएटबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डाएटबद्दल बोलताना शालिनी पासी यांनी खुलासा केला की, चांगल्या आरोग्यासाठी काळं मीठ खूप फायदेशीर ठरतं.

Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
12 / 31

“तिच्याबद्दलचं वास्तव समजल्यावर मला धक्का बसला”, कमल हासन यांनी कोणाबद्दल केलेलं वक्तव्य?

बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारे कमल हासन आणि सारिका यांची पहिली भेट १९८४ साली 'राज तिलक' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. सारिकाचं बालपण चित्रपटांच्या सेटवर गेलं कारण तिचे वडील सोडून गेले होते. कमल हासन यांनी तिच्या संघर्षाची आठवण सांगितली. त्यांनी १९८८ मध्ये लग्न केलं, पण २००४ मध्ये विभक्त झाले. त्यांच्या दोन मुली श्रुती आणि अक्षरा आहेत.

Bigg Boss Marathi Fame Abhijeet Sawant dance on Afghan Jalebi song in bathroom video viral
13 / 31

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा बाथरुममध्ये जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व संपल्यापासून अभिजीत सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. आपल्या कामासह फोटो, व्हिडीओ शेअर करत आहेत. नुकताच त्याने बाथरुममधील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे; जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Ankita Walawalkar and Suraj Chavan meeting video has goes viral on social media
14 / 31

Video:…म्हणून अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणची घेतली उशीरा भेट, म्हणाली, “पॅडी दादा…”

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ( Suraj Chavan ) खूप प्रसिद्धीझोतात आला आहे. अनेकजण सूरजला भेटण्यासाठी त्याचं गाव गाठत आहेत. राजकीय मंडळींसह इतर कलाकार मंडळी सूरजची भेट घेताना दिसत आहेत. तसंच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील सदस्य देखील वेळात वेळ काढून सूरजची भेट घेत आहेत. अंकिता वालावलकर ( Ankita Walawalkar ) होणाऱ्या नवऱ्याला (कुणाला भगत) घेऊन सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी गेली होती. याचा व्हिडीओ नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Ajit Pawar on Amit Shah
15 / 31

‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवार म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिराळा येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आणि त्यांना पुन्हा विजयी करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा मुख्यमंत्री केले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nitin chauhan death reason
16 / 31

काम मिळत नसल्याने अभिनेत्याने संपवलं आयुष्य, पत्नी घरी नसताना केली आत्महत्या

टीव्ही अभिनेता नितीन चौहान उर्फ नितीन सिंहने आत्महत्या केली आहे. तो ३५ वर्षांचा होता आणि त्याला पत्नी व एक मुलगी आहे. नितीनने मुंबईतील गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये गळफास घेतला. काम मिळत नसल्याने तो नैराश्यात होता. त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले असता नितीन मृत अवस्थेत आढळला. नितीनने 'दादागिरी सीझन २', 'स्प्लिट्सविला' आणि 'क्राइम पेट्रोल'सारख्या शोमध्ये काम केले होते.

Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
17 / 31

राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका, “बाळासाहेब म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस..”

विधानसभा निवडणूक जवळ आली असून २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचा सामना रंगणार आहे. मनसेनेही उमेदवार उतरवले आहेत. राज ठाकरे जोरदार प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार घेत उद्धव ठाकरेंना खडे बोल सुनावले. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते शिवसेनेची काँग्रेस होतना दिसली तर दुकान बंद करेन. आज त्यांचे चिरंजीव हाताच्या पंजाचा प्रचार करत आहेत. ही बाब दुर्दैवी आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

ajit pawar on cm post
18 / 31

अजित पवार म्हणाले, “धरसोड केली तर तुमची विश्वासार्हता राहात नाही”; मुख्यमंत्रीपदाबाबतही…

गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रीपद गौण असून महायुतीचं सरकार निवडून आणणं हे मुख्य लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. ९० जागा मिळाल्या नसल्याने त्यांनी तडजोडीची तयारी दर्शवली आहे. धरसोड केल्यास विश्वासार्हता कमी होते, असंही त्यांनी नमूद केलं.

ajit pawar on sharad pawar (1)
19 / 31

“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांनी मांडलं ६० वर्षांचं गणित!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) सत्ताधारी तर शिवसेना (उद्धव ठाकरे) विरोधी गटात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सत्ताधारी तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) विरोधी गटात आहे. बारामतीत शरद पवारांनी अजित पवारांवर टीका केली, त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

biggest Flop bollywood Movie of 2024
20 / 31

२०२४ चा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा; बॉलीवूडकरांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट, कमावले फक्त..

बॉलीवूड November 9, 2024

दरवर्षी भारतात अनेक चित्रपटांची निर्मिती होते, त्यापैकी काही हिट होतात तर काही फ्लॉप. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट मोठ्या बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही फ्लॉप ठरला. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर, सोनाक्षी सिन्हा यांसारख्या कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाने फक्त ६५.९६ कोटी रुपये कमावले. ३५० कोटींच्या बजेटमुळे निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
21 / 31

‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार मंडळी व्यक्त होताना दिसत आहेत. ‘आई कुठे काय कर’ते मालिका संपल्यानंतर संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेला कोणाची आठवण येईल? जाणून घ्या…

actress Athiya Shetty announces pregnancy
22 / 31

अथिया शेट्टी-केएल राहुल होणार आई-बाबा; अभिनेत्रीने पोस्ट करून दिली आनंदाची बातमी

बॉलीवूड November 8, 2024

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अथियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी लग्न केले होते. अथिया २०२५ मध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
23 / 31

Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

मनोरंजन November 8, 2024

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या त्याच्या आगामी म्युझिक व्हिडीओमुळे चर्चेत आहे. ‘साहिबा’ असं त्याच्या म्युझिक व्हिडीओचं नाव आहे. काही तासांपूर्वीच या म्युझिक व्हिडीओचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये विजय देवरकोंडसह अभिनेत्री राधिका मदान पाहायला मिळाली. अशातच दुसऱ्या बाजूला जिना उतरताना विजय देवरकोंडा जोरात पडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

India highest grossing movie in china Secret Superstar
24 / 31

अवघ्या १६ वर्षांच्या अभिनेत्रीची मुख्य भूमिका, १५ कोटींचे बजेट अन् कमावलेले तब्बल ९०५ कोटी

बॉलीवूड November 8, 2024

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'सिक्रेट सुपरस्टार' या २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने चीनमध्ये कमाईचे रेकॉर्ड मोडले. फक्त १५ कोटी रुपयांच्या बजेटवर बनलेल्या या चित्रपटाने चीनमध्ये ७५० कोटी रुपये कमावले. झायरा वसीमने मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या 'दंगल' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटांनी एकूण ३००० कोटी रुपयांची कमाई केली. झायराने १८ व्या वर्षी इस्लामसाठी बॉलीवूड सोडले.

Bigg Boss 18 hrithik roshan life coach arfeen khan Evicted from salman khan
25 / 31

हृतिक रोशनच्या लाइफ कोचला दाखवला ‘बिग बॉस १८’च्या घराबाहेरचा रस्ता

'बिग बॉस १८'च्या घरात नुकताच टाइम गॉड टास्क पार पडला. यात सारा अरफीन खान बाद झाली आणि तिने गोंधळ घातला. त्याआधी विवियन डिसेनाने पक्षपातीपणे आठ सदस्यांना नॉमिनेट केले. मात्र, चार सदस्यांना सुरक्षित करण्याचा अधिकार घरातील सदस्यांना दिला गेला. त्यामुळे चाहत पांडे, सारा अरफीन खान, अरफीन खान, तजिंदर बग्गा नॉमिनेट झाले. यातून एक सदस्य घराबाहेर झाल्याचं समोर आलं आहे.

actress sreejita de and michael bengali wedding
26 / 31

दीड वर्षांपूर्वी जर्मन तरुणाशी बांधली लग्नगाठ, Bigg Boss फेम अभिनेत्री पुन्हा करतेय लग्न

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १६’ची स्पर्धक श्रीजिता डे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने ३० जून २०२३ रोजी बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपशी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. आता ती बंगाली पद्धतीने पुन्हा लग्न करणार आहे. १० नोव्हेंबरला लग्न, मेहंदी, संगीत, हळदी आणि रिसेप्शनचे कार्यक्रम होणार आहेत. श्रीजिता व मायकल २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहेत.

himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
27 / 31

मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!

हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्यासाठी मागवलेले सामोसे त्यांच्या स्टाफने खाल्ल्याने वाद निर्माण झाला आहे. २१ ऑक्टोबरला सीआयडीच्या कार्यक्रमात हे घडले. CID या प्रकरणाची चौकशी करत आहे, परंतु काँग्रेसने चौकशीचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपाकडून वाद उकरला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. CID ने ही अंतर्गत बाब असल्याचे सांगितले आहे.

Deepika Padukone And Ranveer Singh Spotted with baby dua after delivery video viral
28 / 31

पहिल्यांदाच लाडक्या लेकीबरोबर दिसले दीपिका पादुकोण अन् रणवीर सिंह, व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलीवूड November 8, 2024

काही महिन्यांपूर्वी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दीपिका पादुकोण ( Deepika Padukone ) आणि रणवीर सिंहच्या घरी पाळणा हलला. दोघं पहिल्यांदाच आई-बाबा झाले. ८ सप्टेंबर २०२४ रोजी दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती. आज दीपिकाच्या लेकीला दोन महिने पूर्ण झाले आहेत आणि आजच पहिल्यांदा लेकीबरोबर दीपिका आणि रणवीर दिसले आहेत.

Bigg Boss 18 ekta Kapoor slams on Vivian dsena watch promo
29 / 31

एकता कपूरने ‘बिग बॉस’च्या लाडक्या विवियन डिसेनाला चांगलंच झापलं, म्हणाली…

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील घरात वातावरण सध्या फारच तापलं आहे. दोन ग्रुप पडले आहेत. ज्यामध्ये सातत्याने वाद होतं आहेत. ७ नोव्हेंबरच्या भागात नुसताच राडा पाहायला मिळाला. टाइम गॉडच्या टास्कदरम्यान जोरात वाद झाले. सारा अरफीन खानने विवियन डिसेना, ईशा सिंहवर वस्तू फेकून मारल्या. तर अविनाश मिश्राची थेट कॉलर पकडली. यावेळी विवियनच्या ग्रुपवर टीका करताना साराची जीभ घसरली. नेमकं काय घडलं? आणि एकता कपूर विवियनला काय म्हणाली? जाणून घ्या…

Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
30 / 31

“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली संजवनी म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनार ( Shivani Sonar ) सध्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील मालिकेत पाहायला मिळत आहे. ‘सोनी मराठी’वरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत शिवानी अभिनेता सुबोध भावेसह प्रमुख भूमिकेत दिसत आहे. शिवानीच्या इतर भूमिकांप्रमाणे तिची या मालिकेतील तन्वी आणि गौरीची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. अशातच शिवानीने आपल्या आईला ५०व्या वाढदिवसानिमित्ताने हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

L K Advani Birth day Story
31 / 31

लालकृष्ण आडवाणी, टेनिसची मॅच आणि संघाचं सदस्यत्व! काय आहे ‘तो’ रंजक किस्सा?

भारताचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा आज ९७ वा वाढदिवस आहे. भाजपाच्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आडवाणी यांनी भाजपाच्या २ खासदारांपासून ३०३ खासदारांपर्यंतचा प्रवास पाहिला आहे. लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य कसे झाले? त्याचा किस्साही रंजक आहे.