Bigg Boss OTT फेम अभिनेत्रीने मुंबईत घेतले नवीन घर, भावुक पोस्ट केली शेअर; म्हणाली…
'बिग बॉस ओटीटी २' फेम अभिनेत्री पलक पुरस्वानीने मुंबईत नवीन घर घेतले आहे. पलकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. तिने होणाऱ्या पती रोहन खन्नासोबत हे घर घेतले आहे. पलकने भावुक पोस्टमध्ये तिच्या आनंद आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.