तेजस्वी प्रकाश ९ वर्ष मोठ्या करण कुंद्राशी यंदा करणार लग्न! अभिनेत्रीच्या आईने केला खुलासा
Tejasswi Prakash And Karan Kundra Wedding : हिंदी टेलिव्हिजनविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे तेजस्वी प्रकाश व करण कुंद्रा. ‘बिग बॉस’च्या १५व्या पर्वात ही जोडी जमली. ‘बिग बॉस’मध्येच करणने तेजस्वीला प्रपोज केलं. या जोडीचा आता मोठा चाहता वर्ग आहे. तेजस्वी-करणचे व्हिडीओ, फोटो नेहमी व्हायरल होतं असतात. यंदा ही लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. याच कारण आहे तेजस्वी प्रकाशची आई.