‘कलर्स मराठी’च्या ‘दुर्वा’ मालिकेत झळकणार ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्री
'झी मराठी'नंतर 'कलर्स मराठी'ने नव्या 'दुर्वा' मालिकेची घोषणा केली आहे. 'ठिपक्यांची रांगोळी'मधील अभिनेत्री नम्रता प्रधान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'दुर्वा' मालिकेत रुमानी खरे आणि अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत आहेत. तर शिल्पा नवलकर आणि राजेंद्र शिसातकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही मालिका कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा सांगते.