“डोळ्यावर पट्टी बांधून एका घरात नेलं अन्…”, सुनील पालने सांगितला अपहरणाचा घटनाक्रम
कॉमेडियन सुनील पालने दिल्लीजवळ अपहरण झाल्याचा खुलासा केला आहे. अपहरणकर्त्यांनी २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती, परंतु मित्रांच्या मदतीने साडेसात लाख रुपये दिल्यानंतर त्याला सोडण्यात आलं. सुनीलने सांगितलं की, हरिद्वारमध्ये परफॉर्म करण्यासाठी अमित नावाच्या व्यक्तीने त्याला आमंत्रित केलं होतं. अपहरणकर्त्यांनी त्याला धमकावलं आणि त्याच्या मित्रांना फोन करण्यासाठी त्याचा फोन परत दिला. सुनीलने पोलिसांत तक्रार दिली असून, अपहरणकर्त्यांनी त्याच्या फोनवरील सर्व पुरावे हटवले आहेत.