प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, मित्रांना अटक
'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेत्री सपना सिंहच्या १४ वर्षांच्या मुलाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दोन मित्रांना अटक केली आहे. सपना सिंहने बरेली येथे आंदोलन करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली. आश्वासन मिळाल्यानंतर तिने आंदोलन संपवलं. सागर गंगवारचा मृतदेह शेतात सापडला, त्याच्या डोक्याला गोळीच्या जखमा होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सागर मित्रांबरोबर जाताना दिसला होता.