‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरचा संगीत सोहळ्यात रोमँटिक डान्स, पाहा व्हिडीओ
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘देवमाणूस’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर किरण लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. नुकतीच किरण आणि वैष्णवीला हळद लागली. त्यानंतर संगीत सोहळा पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.