मुहूर्त ठरला! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, जाणून घ्या तारीख
‘झी मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘देवमाणूस २’ या मालिकेलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेत डॉ. अजितकुमार चंद्रकांत देव म्हणजे देवीसिंगची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने उत्कृष्टरित्या साकारली होती. हाच किरण गायकवाड आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अभिनेत्याने नुकतीच लग्नाची तारीख जाहीर केली आहे.