‘धाकट्या सूनबाई’ मालिकेत प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची एन्ट्री! पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार
'झी मराठी' वाहिनीवर २८ सप्टेंबरपासून 'धाकट्या सूनबाई' ही नवीन मालिका सुरू होणार आहे. 'कोठारे व्हिजन्स' निर्मित या मालिकेत चिन्मयी मोरे आणि मंदार जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. तर, 'नसती उठाठेव' नावाने ओळखली जाणारी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहा कुलकर्णी पहिल्यांदाच टीव्ही मालिकेत झळकणार आहे. ही मालिका दोन कुटुंबांचे विचार आणि नात्यांमधील गुंतागुंतीवर आधारित आहे.