एकता कपूरची मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार शेवटचा भाग
प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने 'नागिन ७' मालिका लवकरच बंद होणार असल्याची घोषणा केली आहे. टीआरपी घसरल्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. एकताच्या वाढदिवसाच्या दिवशी, ७ जूनला, मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल. मालिकेच्या शेवटच्या भागांमध्ये नवीन कलाकार आणि मोठे ट्विस्ट दाखवले जातील. चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.