जावई असावा तर असा! प्रसिद्ध अभिनेत्याने सासूबाईंना गिफ्ट केला फ्लॅट, रडत म्हणाल्या…
टीव्हीवरील लोकप्रिय जोडपं दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये दीपिकाच्या आईसाठी फ्लॅट खरेदी केल्याची आनंदाची बातमी शेअर केली. दीपिकाची आई २०१४ पासून भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटला शोएबने विकत घेतलं. दीपिकाने पती शोएबबद्दल अभिमान व्यक्त केला. ही बातमी शेअर केल्यावर चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.