‘या’ मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीने २५ व्या वर्षी उरकलं लग्न, पतीही आहे प्रसिद्ध अभिनेता
अभिनेत्री आयुषी खुराना हिने ६ डिसेंबर रोजी दिल्लीत अभिनेता व उद्योजक सूरज कक्करशी गुपचूप लग्न केलं. 'जाने अनजाने हम मिले' मालिकेत मुख्य भूमिका करणारी आयुषीने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केलं. आयुषीने फक्त पाच दिवसांची रजा घेतली होती आणि ती आता मालिकेच्या शूटिंगसाठी परतली आहे.