“त्याने माझ्या नितंबाना स्पर्श केला अन्…” सुप्रीम कोर्टात अभिनेत्रीबरोबर झालेलं गैरवर्तन
अभिनेत्री निमृत कौर अहलूवालियाने १९ वर्षांची असताना सर्वोच्च न्यायालयात झालेल्या गैरवर्तनाचा अनुभव शेअर केला. एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात असताना एका पुरुषाने तिच्या नितंबांना स्पर्श केला आणि शर्टमध्ये हात टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेने तिला धक्का बसला आणि ती रडली. एका महिला वकिलाने तिला मदत केली आणि त्या पुरुषाला कानशिलात लगावली. निमृतने या घटनेबद्दल भावुक होऊन तिच्या अनुभवाची आठवण सांगितली.