“मी १२ तासांत ५० हजार कमावतो”, अभिनेत्याने सांगितला कमाईचा भन्नाट प्लॅन, मुंबईत घेतलं घर
सध्या चित्रपटांना संमिश्र प्रतिसाद मिळत असताना टीव्ही मालिकांची लोकप्रियता कमी होत आहे. अभिनेता सूरज सोनिकच्या मते, व्हर्टिकल व्हिडीओ ड्रामामुळे कलाकारांना नवीन कामाच्या संधी मिळत आहेत. सूरजने १०० हून अधिक व्हर्टिकल सीरिजमध्ये काम केले असून, तो एका जाहिरातीसाठी १ लाख रुपये मानधन घेतो. मायक्रो-ड्रामांची लोकप्रियता वाढत असून, कलाकारांना सतत काम आणि चांगली कमाई मिळत आहे.