सैफ-करीनाच्या लग्नात २२५ रुपयांसाठी भांडी घासणारा अभिनेता पोहोचला Bigg Boss 20 मध्ये
बिग बॉस २० मध्ये 'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खान सहभागी झाला आहे. राजस्थानच्या लहान गावात जन्मलेल्या आसिफने वेटर म्हणून काम करत सैफ अली खान व करीना कपूरच्या लग्नात भांडी घासली होती. वडिलांच्या निधनानंतर आर्थिक अडचणींमुळे त्याने विविध कामे केली. अभिनयाची आवड जोपासत त्याने 'पंचायत' सीरिजमधून लोकप्रियता मिळवली. आता बिग बॉस २० मध्ये त्याच्या प्रवासाकडे सर्वांचे लक्ष आहे.