“हा मूर्खपणा आता पुरे झाला!” गरबा उत्सवातील मुस्लिमांच्या प्रवेशावरून अभिनेत्री संतापली
'साथ निभाना साथिया' फेम अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. तिने गरबा हा फक्त नृत्य नसून भक्तीचा आत्मा असल्याचं सांगितलं. अमृता फडणवीस यांनी गरबा सर्वसमावेशक उत्सव असल्याचं मत मांडलं. भाजपा नेते नितेश राणे यांनी मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेला पाठिंबा दिला.