“माझे अरेंज मॅरेज ५ महिन्यांत मोडले”, २७ वर्षांच्या अभिनेत्याचा घटस्फोटाबद्दल खुलासा
'बिग बॉस २०' च्या तिसऱ्या आठवड्यात स्पर्धक कुशल तंवर उर्फ गुल्लूने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. त्याने २०२४ मध्ये घटस्फोट घेतल्याचं सांगितलं. अवघ्या ५ महिन्यांत त्याचं अरेंज मॅरेज मोडलं होतं. रोडीज आणि स्प्लिट्सव्हिला सारख्या शोमध्ये प्रसिद्ध झालेल्या गुल्लूने आपल्या निर्णयामुळे कुटुंबीय नाराज झाले होते, पण आता त्यांना त्याचा अभिमान आहे.