४० व्या वर्षी आई होणार लोकप्रिय अभिनेत्री, अडीच वर्षापूर्वी एअरलाइन कॅप्टनशी केलंय लग्न
लोकप्रिय अभिनेत्री व गोविंदाची भाची कश्मीरा इराणी आई होणार आहे. 'दोस्ती यारियाँ मनमर्जियाँ' फेम कश्मीरा ४० व्या वर्षी आई होणार आहे. तिने एअरलाइन कॅप्टन अक्षत सक्सेनाशी अडीच वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. कश्मीराने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही आनंदाची बातमी दिली आहे. चाहत्यांनी व सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. कश्मीरा इराणीने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली आणि टेलिव्हिजन व बॉलीवूडमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.