KBC 18: IIT तून शिकलेला स्पर्धक ISROच्या २५ लाखांच्या प्रश्नावर अडकला, उत्तर होतं साडी!
सध्या 'कौन बनेगा करोडपती १८' सुरू आहे. बेंगळुरूच्या कृतज्ञ नायरने २५ लाख रुपयांच्या १३ व्या प्रश्नापर्यंत पोहोचून १२.५ लाख रुपये जिंकले. तो अॅडोब कंपनीत काम करतो आणि पत्नीबरोबर कंटेंट क्रिएटर आहे. १३ व्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने त्याने खेळ सोडला. इस्रो शास्त्रज्ञ नंदिनी हरिनाथ यांच्या साडीबद्दलचा प्रश्न होता. अमिताभ बच्चन यांनी 'जेन झी' पिढीचं कौतुक केलं.