आईने ३१ वर्षांपूर्वी नेसलेल्या साडीत फोटोशूट, ‘या’ लोकप्रिय मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?
लोकप्रिय मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या एका पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. शिवानीने तिच्या बारशाला आईने नेसलेली ३१ वर्षे जुनी साडी पुन्हा नेसली आणि फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसतेय. शिवानीने आईच्या साडीतील तीन फोटो शेअर केले आहेत आणि त्यावर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.