राहुल वैद्यने शारीरिक संबंधाबद्दल टिप्पणी; पत्नी म्हणाली, “वेडा आहेस का?” नेटकरी भडकले
मराठमोळा गायक आणि 'बिग बॉस १४' फेम राहुल वैद्य सध्या 'धमाल विथ पती पत्नी और पंगा' या शोमधील एका क्लिपमुळे ट्रोल होत आहे. या क्लिपमध्ये राहुलने लग्नानंतर शारीरिक संबंधांबद्दल टिप्पणी केली, ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली. काहींनी त्याच्या विधानाला दिशाचा अपमान म्हटलं, तर काहींनी त्याची बाजू घेतली. राहुलने २०२१ मध्ये दिशा परमारशी लग्न केलं असून त्यांना एक मुलगी आहे.