‘नागिन’ फेम अभिनेत्याचा घटस्फोट, ४ वर्षांनी केली घोषणा; ११ वर्षांची आहे मुलगी
टीव्ही अभिनेता विजयेंद्र कुमेरिया आणि प्रीती भाटिया यांचा घटस्फोट झाला आहे. विजयेंद्रने स्वतः या बातमीला दुजोरा दिला आहे. ते चार वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांना किमया नावाची ११ वर्षांची मुलगी आहे. प्रीतीने सोशल मीडियावर मुलीचे फोटो शेअर केले होते, तर विजयेंद्रने मुलीबरोबरचे फोटो पोस्ट केले होते. विजयेंद्र 'उडान', 'नागिन 4' यांसारख्या शोसाठी ओळखला जातो.