करण सिंह ग्रोव्हरच्या पहिल्या पत्नीला ओळखलंत का? आता करतेय ‘हे’ काम
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा निगमने 'चूडियां' आणि 'कृष्णा अर्जुन' मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. तिचं पहिलं लग्न अभिनेता करण सिंह ग्रोव्हरशी झालं, पण १० महिन्यांतच घटस्फोट झाला. २०१२ मध्ये तिने मयंक आनंदशी दुसरं लग्न केलं. आता ती अभिनयापासून दूर असून पतीसोबत फॅशन डिझायनिंग करते. आज तिचा ४७ वा वाढदिवस आहे.